Marathi Kayda No. 1 YouTube Channel

Expert Lawyer in Divorce, Marriage & All Criminal Case​s

मराठी कायदा तर्फे YouTube वर मोफत कायदेशीर मार्गदर्शन केले जाते,तसेच ऑफिस तर्फे महाराष्ट्र व इतर राज्यात केसेस घेतल्या जातात, तसेच सविस्तर पेड सल्ला दिला जातो.

माननीय ॲड श्री संदीप सर यांच्या यशस्वी कारकिर्दी मध्ये त्यांनी अनेक राज्यात काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्रा सोबत दिल्ली, गुजरात, पंजाब,मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, अश्या अनेक राज्यात काम केले आहे, त्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांसोबत काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे.

त्यांच्याकडे मराठी कायदा या फर्म मुळे बहुतांश कामे ही क्रिमिनल व कौटुंबिक वादाची असतात, त्यात देखील पती च्या बाजूने केसेस असणे हे त्यांचे  वैशिष्ट आहे.

तसेच त्यांचा चॅनल मराठी कायदा ने अल्पावधीत महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे, त्यांचे अनेक व्हिडिओ हे समाज उपयोगी
असतात, त्यामधून त्यांनी लोकांना मोफत ज्ञान देणे नेहमीच सुरू ठेवले आहे, परंतु या चॅनल मुळे महाराष्ट्रातून व देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या कडे येणाऱ्या लोकांची रीघ वाढली आहे, त्यामुळे मोफत सल्ला देण्याचे काम अविरत चालूच ठेवून बाहेरील येणाऱ्या सर्व लोकांना ते अगदी माफक फी मध्ये सल्ला देतात.

ॲड संदीप सर हे करत असलेली पत्नी वर्गाची पोलीस चौकशी ही खासकरून खूप जास्त प्रसिद्ध आहे, व पतीवर्गाने या चौकशी ला अक्षरशः डोक्यावर घेतले गेले आहे.

मराठी कायदा ऑफिस तर्फे केल्या गेलेल्या या चौकशी मध्ये पोलिसांतर्फे पत्नी ला समन्स पाठवून बोलावले जात असल्यामुळे अनेक पुरावे तिथे उघड होऊन जमा होत असल्यामुळे पुढील केस जिंकण्यास मोठा हातभार लागत आहे, किंवा असे ही म्हणता येईल की तिचं पुढील यशाची गुरुकिल्ली होत आहे.

संदीप सर कोणतीही केस घेताना पक्षकराला एक चार्ट पाठवतात ज्यातील प्रश्नावली द्वारे ते केस समजून घेतात व नंतरच पुढील कारवाई करतात, त्यामधून प्रत्येक केस वैयक्तिक पूर्ण समजून घेणे व ती पक्षकरा पेक्षा जास्त नीट मांडणे ही त्यांची खासियत आहे…
पक्षकराची केस फक्त तोंडी ऐकणे व त्यामधून डायरेक्ट केस बनवणे असा प्रकार ते कधीही करत नाहीत. तर ते केस पक्षकारकडून त्याला वेगळे वेगळे मुद्दे देवून लिहून घेतात, पुन्हा त्यावर प्रश्नावली देतात, त्यांनतर सर्व कहाणी समजून घेवून स्वतः पक्षकरला काहीं प्रश्न करतात मगच ती स्टोरी फायनल करतात त्यामुळे आपली कहाणी योग्य रित्या मांडली जाते…
कोर्टात पुरावे योग्य रीतीने, लॅब मधून टेस्ट करून व इतर अनेक पद्धतीने ते पुरावे कोर्टात ग्राह्य होतील असे मांडणे हे एक त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट आहे. त्यामध्ये देखील संदीप अनेकांना बुधवारी सायंकाळी मोफत सल्ला देतात,
सविस्तर सल्ला साठी मात्र त्यांनीं काही फी निश्चित केली आहे, त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे केस देण्यास येत असतात…

नॉर्मल नोटीस पाठवण्यास त्यांचा विरोध असतो त्या ऐवजी ते पत्नी ची पोलीस चौकशी वर भर देतात. ही त्यांची पद्धत ज्यांनी ज्यांनी केली त्यांना बहुतांश वेळा संपूर्ण न्याय मिळाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्व महत्त्वाच्या तारखा स्वतः ॲड संदीप  सर हजर राहून काम चालवतात,
त्यांनीं भेट घेण्याची असेल तर आपणास मुंबई, पुणे, येथे अपॉइंटमेंट प्रक्रिया पार पाडून भेट घ्यावी लागते .

2200+

Cases Solved
by Marathi Kayda

7000+

Happy Clients
of Marathi Kayda

5+

Regional Offices
of Marathi Kayda

10+

Legal Associates
of Marathi Kayda

Divorce

जसे घटस्फोटा नंतर पती पत्नी ला पत्नी म्हणत नसतो तसेच सासू देखील तिला सून म्हणत नसते, .. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की, भारतीय समाजात घटस्फोट हा पती पत्नी चा होत नसून तो संपूर्ण कुटुंबाचा होत असतो... त्यामुळे जेव्हा घटस्फोट घेण्याचे ठरवले जाते, त्यावेळी त्याची संपूर्ण तयारी करणे आवश्यक असते, कारण कोर्ट फक्त घटस्फोट देण्यास बसलेले नसते, त्यामुळे घटस्फोट ची केस हरणे कधीही परवडत नाही, कारण त्यामुळे वेळ,पैसा आणि त्या ही पेक्षा महत्त्वाचे की तुमचे वय निघून जात असते.... त्यामुळे घटस्फोट ची केस ही फक्त जिंकण्यासाठीच करावी... त्यामुळे त्याची पूर्व तयारी खूप आवश्यक आहे. ॲड संदीप सर...

Marriage

लग्न हा संस्कार आहे, लग्न हा रिवाज आहे, त्यामुळे संस्कार आणि रिवाज कधीही मनमानी वर चालत नाहीत, किंवा बनत नाहीत, त्यामुळे ज्या लग्नात संस्कार आणि रिवाज पाळले जात नाहीत, त्या लग्नाचे तुटणे नक्की आहे.... त्यामुळे हा विवाह तुटताना तोटा होणार नाही, किंवा खोट्या केस होणार नाहीत याची काळजी घेता येते... आवश्यक आहे पहिली कारवाई करण्याचा.... जीसकी लाठी उसकी भैस.... प्रथम कारवाई करणाऱ्यास जिंकण्याची अधिक संधी राहते त्यामुळे ही संधी आपण दवडू नका. ॲड संदीप सर...

Criminal Case

फौजदारी कायदे, गुन्हे आणि पोलीस सिस्टीम : या बाबत बोलावे तितके कमी आहे, अनेकवेळा खोटे गुन्हे दाखल होत असतात, किंवा तो गुन्हा घडण्यास तसे कारण असते.... अनेक वेळा आपल्या सिस्टीम मध्ये खोटे गुन्हे दाखल होतात आणि खरे गुन्हे दाखलच होत नाहीत... त्यावेळी पोलिसांकडे योग्य रीतीने केस मांडणे, दाखल करून घेणे किव्वा खोटा गुन्हा असेल तर त्याचे पुरावे योग्य शास्त्रीय पद्धतीने देणे हे गरजेचे आहे. हे करणे आवश्यक आहे, त्यामुळे आपल्याला केस जिंकायला मदत होते... आणि मगच न्याय मिळतो.... केस दाखल होत नसेल किंवा अनेक वेळा असे म्हटले जाते की माझ्याकडे अनेक पुरावे असून पत्नी विरुद्ध केस होत नाही, होय, कारण तसे कायदे नाहीत, त्यामुळे हताश होण्याचे कारण नाही, आपली केस योग्य रीतीने योग्य पद्धतीने मांडली तर त्या मध्ये पोलिसांना देखील दखल घ्यावी लागते.. त्याचे ट्रेनिंग आम्ही मराठी कायदा ऑफिसतर्फे देतो, त्यामुळे लोकांची पोलीस स्टेशन विरुद्ध असणारी चुकीची भीती निघून जाते व न्याय मिळतो... न्याय हा मिळत नसतो तो मिळवावा लागतो. ॲड संदीप सर...

How We Work

Consultation

Strategy

Action

Office Locations

YouTube वर मोफत कायदेशीर मार्गदर्शन केले जाते मराठी कायदा तर्फे,तसेच ऑफिस तर्फे महाराष्ट्र व इतर राज्यात केसेस घेतल्या जातात, तसेच सविस्तर पेड सल्ला दिला जातो.

मुंबई

पुणे

कोल्हापूर

सातारा

मला मराठी कायदा फर्म आणि सेवा या बद्दल माहिती हवी आहे.